बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाववरून देशातील महत्त्वाच्या अशा 8 शहरांना विमानसेवेद्वारे जोडण्यात आले होते. त्यामध्ये आता महाराष्ट्रातील औरंगाबादची भर पडणार आहे. ट्रुजेड एअरने सुरू केलेल्या बेळगाव- हैदराबाद या मार्गावरील विमान हैदराबादला पोहचल्यानंतर औरंगाबादला जाणार आहे. यामुळे आता प्रवाशांना बेळगाव – औरंगाबाद असा प्रवास करता येणार आहे.
ट्रुजेड कंपनीने आपल्या बेवसाईडवरून बुकिंगसाठी औरंगाबाद हा पर्याय सुरू केला आहे. या मार्गावरील तिकीटाचे प्राथमिक दर 2999 असे दाखविण्यात येत आहेत. दुपारी 1 वाजता बेळगाववरून सुटणारे विमान 2.25 वा. हैदराबादला पोहचणार आहे. हैदराबाद येथे 3 तास 25 मि विश्रांती घेवून 5.50 वा. हैदराबाद येथून सुटून सायंकाळी 7.20 वा. औरंगाबाद येथे पोहचणार आहे. त्यामुळे बेळगावच्या नागरिकांना औरंगाबादचा प्रवास आता सोपा होणार आहे.