प्रतिनिधी / फोंडा
बाळ्ळी-केपे येथील आदर्श कृषि खरेदी विक्री सहकारी संस्थेचा फोंडा व सत्तरी तालक्यात विस्तार करताना कुर्टी फोंडा येथील मार्केट यार्डात व वाळपई मार्केट यार्ड येथे खाशा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. फोंडा शाखेचा उद्घाटन सोहळा बुधवार 24 रोजी सकाळी 10 वा. त्यानंतर सायंकाळी 4 वा. वाळपई शाखेचे उद्घाटन होणार आहे.
आदर्श कृषि संस्था ही गोव्यातील काजू खरेदीत अगेसर असून सेंद्रीय काजू लागवडीसाठी नेहमी शेतकऱयांना प्रोत्साहन करीत असते. मार्केट यार्ड येथीलऍग्री बाजाराच्या तळमजल्यावर शॉप नं. 1 शेती मालाची खरेदी करण्यात येणार असून दुसऱया दुकानात ड्राय प्रुट व सोसायटीचा बॅकिंग काऊटरची सोय शेतकऱयासाठी करण्यात आलेली आहे. फोंडा येथील उद्घाटन सोहळय़ाला फोंडा पालीकेचे नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, मार्केटींग बोर्डाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, फोंडा मार्केट यार्डाचे दुर्गाप्रसाद वैद्य, कुर्टी खांडेपारचे सरपंच गुरूदास खेडेकर, हरीचंद्र गावडे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 4 वा. होणाऱया वाळपई शाखेच्या उद्घाटन सोहळय़ाला माजी उपसभापती नरहरी हळदणकर, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, मार्पेंटींग बोर्डाचे संचालन पुरूषोत्तम खाडीलकर, प्रशांत मराठे, विषा मराठे, सहाय्यक निबंधक पंकज मराठे उपस्थित राहणार आहेत. केवळ 21 सभासदासह सुरू करण्यात आलेल्या आदर्श संस्थेत आज 28754 भागधारक असून कृषि, बॅकिंग, विमा, शैक्षणिक क्षेत्रात काम करीत आहे. राज्यात काजू खरेदीसाठी शेतकऱयाना सर्वाधिक दर देणारी संस्था म्हणून नावाजलेली आहे. संस्थेतर्फे एकूण 114 युवकांना रोजगार उपलब्ध केलेला आहे. फोंडा व सत्तरी तालुक्यातील शेतकऱयासाठी शेतकी सुविधा उत्तमरित्या पोचविण्याचे उद्दिष्टासह दोन्ही शाखा सुरू करण्यात येत असल्याची माहिती प्रकाश वेळीप यांनी दिली. सर्व शेतकऱयांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष वेळीप यांनी केले आहे.