जिल्हय़ातील एकूण 39 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक’ पुरस्कारांचे वितरण यावर्षी देखील केले जाणार आहे. रविवार दि. 5 रोजी सकाळी 10.30 वा. महांतेश नगर येथील महंत भवन येथे होणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील एकूण 39 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यावर्षी पुरस्कारांवर मराठी माध्यमातील शिक्षकांचा वरचष्मा दिसून आला.
मिना कुलकर्णी (प्राथमिक शाळा बसवण कुडची), नारायण करंबळकर (ढोकेगाळी, ता. खानापूर) प्रकाश हुलमनी (सोनट्टी ता. बेळगाव), सुमित्रा मोडक (सरकारी प्राथमिक मराठी मुलांची शाळा क्र. 25, गोवावेस, बेळगाव) सदानंद पाटील (मुख्याध्यापक, गणेबैल ता. खानापूर), रवी मधाळे (एसएलव्हीके हायस्कूल, अगसगे ता. बेळगाव) सदानंद वड्डर (महांतेश नगर, बेळगाव), इस्माईल बागवान (मुख्याध्यापक, मंग्यानकोप ता. खानापूर), भारती पाटील (सरकारी उच्च प्राथमिक शाळा क्र. 22, रिसालदार गल्ली, बेळगाव) विवेक सुतार (सरकारी उच्च प्राथमिक शाळा राजहंसगड ता. बेळगाव), भरमाण्णा देवरमणी (मुख्याध्यापक, सरकारी उच्च प्राथमिक शाळा, कावळेवाडी) रुद्राप्पा बजंत्री (सुरपूर, केरवाड ता. खानापूर), महावीर करशेट्टी (सोमनट्टी, ता. बेळगाव), सुमंगला दोडमणी (कन्नड मुलांची शाळा, रूक्मिणी नगर, बेळगाव) आय. डी. हिरेमठ (मुख्याध्यापक, रामतीर्थ नगर), नारायण देसाई (मुख्याध्यापक नंदगड हायस्कूल, ता. खानापूर) या शिक्षकांना पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.