वर्षाच्या तुलनेत 38 टक्के अधिक – महसूलात वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
आदित्य बिर्ला सनलाईफ असेट् मॅनेजमेंट(एएमसी) कंपनीला दुसऱया तिमाहीत 173.1 कोटी रुपयाचा फायदा झाला आहे. एक वर्षाच्या अगोदर समान तिमाही कालावधीच्या तुनलेत हा नफा 38 टक्क्यांनी अधिक राहिला असल्याची माहिती आहे. 2020-21 च्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 125.4 कोटी रुपयांचा लाभ झाला होता.
आदित्य बिर्ला सनफाईफ असेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए.बालासुब्रमणियनने म्हटले आहे, की ‘आम्ही सलग आपल्या ओव्हरऑल असेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम) वाढविण्यासाठी ध्येय केंद्रीत करण्यावर भर देणार आहोत. एसआयपीमध्येही आमची वाढ सलग राहिली आहे. यामुळे इक्विटी एयूएम, बी 30, फोलियोची संख्या आणि वेगळय़ा उत्पादनांमध्ये ऑफर देण्यात आमचे योगदान राहिल्याचे बालसुब्रमणियन यांनी स्पष्ट केले.
चालू महिन्यात झाली लिस्ट
चालू महिन्यात बिर्ला असेट मॅनेजमेंट कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणारी चौथी म्युच्युअल फंड कंपनी ठरली आहे. एयूएमच्या आधारे वर्षाच्या पातळीवर 26 टक्क्यांची वाढ नेंदवली आहे.
कंपनीजवळ 73 लाख फोलियो
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनी जवळ 73 लाख फोलियो असून दुसऱया तिमाहीत हा आकडा राहिला आहे. पहिल्या सहामाहीत 5.95 लाख नवीन फोलियो जोडले आहेत. महिन्याच्या आधारे कंपनीची एसआयपी येणार असून रक्कम 866 कोटी रुपयावर राहणार आहे. दुसऱया तिमाहीत कंपनीने 3.20 लाख नवीन एसआयपी खाती उघडली आहेत. वर्षाच्या आधारे ही वाढ 110 टक्क्यांवर राहिली आहे.