प्रतिनिधी /बेळगाव
येथील प्रतिष्ठितआदित्य मिल्क कंपनीने सुगंधी दूधांचे पाच नवे उत्पन्न बाजारपेठेत आणले आहेत, अशी माहिती आदित्य मिल्कचे व्यवस्थापक संचालक शिवकांत सिदनाळ यांनी दिली.
खासगी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कंपनीच्या कार्यक्रमात बोलताना शिवकांत पुढे म्हणाले, हा देशातच पहिला प्रयत्न आहे. केवळ 10 रुपयांत बाटलीमध्ये सुगंधी दूध उपलब्ध होणार आहे. बदाम, बटरस्कॉच, चॉकलेट, पिस्ता व कुल्फी फ्लेवर बाजारात आले आहेत.
आपल्या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे पनीर तयार केला जातो. ग्राहकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अनेक नवे उत्पन्न बाजारपेठेत आणण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. कंपनीच्या कामगारांच्या मेहनतीमुळे हे शक्मय झाले आहे, असे शिवकांत सिदनाळ यांनी सांगितले. यावेळी संचालिका दीपा सिदनाळ, व्यवस्थापक गणेश, नियाज व इतर उपस्थित होते.