ऑनलाइन टीम / पुणे :
कित्येक मैल पायी प्रवास करुन शिक्षण घेण्यासाठी येणा-या आदिवासी वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना पुणेकरांतर्फे सायकली व खेळणी भेट म्हणून देण्यात आली. पुण्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पौड परिसरात अनेक आदिवासी पाडे आजही आहेत. तेथील मुले जवळच्या जिल्हापरिषद शाळांमध्ये ऊन-पावसाची तमा न बाळगता शिकायला पायी जातात. त्यांच्याकरीता ही भेट देण्यात आली.
बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टच्या पुढाकाराने मंडईतील प्रसिद्ध व्यावसायिक रमेशभाई पटेल यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम पौड परिसरातील जिल्हा परिषद शाळा सुतारवाडी येथे घेण्यात आला. यावेळी रमेशभाई पटेल, शैलेश पटेल, आरती पटेल, मंडळाचे अध्यक्ष पियुष शाह, नंदू ओव्हाळ, रितेश प्रभू, सचिन आखरे, निलेश शेंडे, सतिश सुतार, माजी सरपंच गणेश सुतार, सामाजिक कार्यकर्ते मारुती सुतार, सरपंच श्रद्धाली सुतार, उपसरपंच शेखर शिंदे, सुवर्णा सुतार, उमेश सुतार, सूरज सुतार, सचिन धुमाळ, दीपक सोनवणे, विजय वरखडे, प्रविण सातव, सागर धुमाळ, रमेश रायरीकर, दीपक मेंगडे, सचिन सुतार, धनराज सुतार, पराग सुतार आदी उपस्थित होते. रमेशभाई पटेल यांचा पुणेरी पगडी घालून सन्मान करण्यात आला.
सुतारवाडी, माले, कलमशेत, बेलावडे आदी ठिकाणी हा कार्यक्रम झाला. माले येथे मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष शरद शेंडे, दीपक करांजवने, सागर धुमाळ, सुहास शेंडे, मयुर जाधव, शाम शेडगे, हनुमंत शेंडे, मुख्याध्यापक हनुमंत भूमकर, शिक्षक राजेंद्र पळसकर आदींनी उपक्रमाला विशेष सहकार्य केले. आत्ता १० सायकली व इयत्ता १० वी मध्ये सर्वाधिक गुण मिळविणा-या आणखी ३ विद्यार्थ्यांना सायकली भेट देण्यात येणार आहे. निलेश सुतार यांनी सूत्रसंचालन केले.