ऑनलाइन टीम / पुणे :
रंगबेरंगी फुग्यांनी केलेली आकर्षक सजावट… मिकीमाऊस बरोबर डिजेच्या गाण्यावर मनसोक्त नाचणारी बच्चे कंपनी… टॅटू , जम्पिंग जॅक, आगगाडी, घोडागाडी, बग्गी, बलून फायरिंग, रिंग गेम अशा अनेक खेळाचा आनंद घणारे बालचमू… अशा उत्साही वातावरणात विशेष मुलांनी बाल आनंद मेळाव्याचा आनंद घेत नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले.
अनाथ, दिव्यांग आणि समाजातील दुर्लक्षित मुलांना नवे वर्ष साजरे करण्याचा आनंद घेता यावा, यासाठी केअर टेकर्स सोसायटीच्यावतीने जिल्हास्तरीय बाल आनंद मेळावा २०२० चे आयोजन करण्यात आले होते. आनंद मेळाव्याचे उद्घाटन माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, अॅड.दिलीप काळे, ज्ञानेश पुरंदरे, निलेश भिसे, अश्विनी गायकवाड, अब्दुल गफ्फार शेख, अधिनाश खंडारे, केअर टेकर सोसायटीचे कुमार शिंदे, पवन देडगावकर, हर्षद बनसोडे, सुवर्णा शिराळ, सुफियान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.