ऑनलाईन टीम / नवी मुंबई
राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून विधानमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधीपक्षांनी एकत्र येत महाविकासआघाडीच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आमदार नितेश राणेदेखील इतर भाजपा आमदारांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते. याच दरम्यान राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात प्रवेश करत असताना नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज देण्यास सुरुवात केली. याबाबीचा निषेध करण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीने यावरुन नितेश राणे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली होती.
याच पार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याचा निषेध करत आपली भूमिका मांडली. यावर बोलताना अजित पवार यांनी तुम्ही या सभागृहाचे प्रतिनिधित्व करता. कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं आपण प्रतिनिधित्व करत नाही. याची जाणीव ठेवली पाहिजे असा टोला हाणला. आचारसंहितेचे पालन करणे सभागृहाच्या प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे. राज्यातला प्रत्येक जण विधीमंडळातल्या प्रत्येकाच्या वर्तनाकडे बारकाईने लक्ष ठेवून असतो. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागलं पाहिजे. या सभागृहामध्ये काही जण ग्रामीण भागात काम करुन आलेले असतात, काही तर काही जण एकदम नवी कोरी पाटी असते, त्यांना कसलाही अनभुव नसतो. पक्षाचा पाठिंबा असतो म्हणून निवडूण येतात. ही आजपर्यंतची परंपरा आहे. असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी पवार यांनी एक खंत ही बोलुन दाखवली. ते म्हणाले माझी मते मी स्पष्टपणे मांडतो मी कधी त्यामध्ये पक्षीय राजकारण आणत नाही. पण संससदीय सभ्याचार आणि शिष्टाचार हे पुस्तक सर्वांना वाचले पाहिजे. या सभागृहामध्ये निवडूण येताना लाखों मतदार तुमच्याकडे बघून मतदार करतात त्यातून तुम्ही या सभागृहाचे प्रतिनिधित्व करता. कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं आपण प्रतिनिधित्व करत नाही याची जाणीव ठेवली पाहिजे.असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला ही हाणला