वार्ताहर/ कुर्ली
सौंदलगा प्राथमिक आरोग्य केंद्र व आप्पाचीवाडी उपकेंद्र यांच्यावतीने कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी 55 जणांना प्रतिबंधक लस दिली. लसीकरणाचा शुभारंभ आप्पाचीवाडी ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण पारे, संजय खोत यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी परिचारीका अश्विनी इंगवले यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर घ्यावयाची काळजी यासंबंधी मार्गदर्शन केले. आप्पाचीवाडी येथील 55 जणांना लस देण्यात आली. यामध्ये 34 पुरुष व 21 महिलांनी याचा लाभ घेतला. तसेच 50 जणांची रॅपीड चाचणी करण्यात आली. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहितीही दिली.
यावेळी ग्रा. पं. सदस्य आनंदा कुवाळे, मंगल जाधव, विश्वास आबणे, दीपक सुतार, आप्पासाहेब बोते, अर्जुन कुंभार, अंजली रेंदाळे, अंगणवाडी सेविका शानाक्का खोत, अंजली माळी, ललिता नाईक, आशा कार्यकर्त्या निता कांबळे, ललिता कांबळे, मंगल कुंभार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.