मूक-बधिरांची आर्त हाक : जिल्हाधिकाऱयांना मागण्यांचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
आम्ही मूक-बधीर आहोत म्हणून आमच्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. आम्हाला काम हवे आहे. त्यासाठी शासकीय कामामध्ये सामावून घ्यावे. यासह इतर मागण्यांसाठी बेळगाव जिह्यातील मूक-बधीर असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
आम्हाला देण्यात येणारे वेतन हे तुटपुंजे आहे. त्यामध्ये जीवन जगणे कठीण आहे. 500 किंवा 1000 रुपयांमध्ये जीवन जगायचे कसे? त्यासाठी आम्हाला सरकारी नोकऱयांमध्ये आरक्षण देऊन त्यामध्ये सामावून घ्यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
महिन्याला किमान 5 हजार रुपये द्यावेत. याचबरोबर इतर सर्व शासकीय सुविधा द्याक्यात, असेही या निवेदनात म्हटले आहे. मूक-बधीर असलेल्या सर्वांना 75 टक्क्मयांपेक्षा अधिकचे वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे. कारण 75 टक्मक्यापेक्षा अधिक वैद्यकीय प्रमाणपत्र असलेल्यांना पेन्शन जास्त आहे. तेव्हा प्रत्येक मूक-बधीर व्यक्तीला 75 टक्क्मयांचेच प्रमाणपत्र द्यावे, असे या निवेदनात म्हटले आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी किरण नेगनाळ, कुमार नेगनाळ यांच्यासह मूक-बधीर उपस्थित होते.