वेंगुर्ले / प्रतिनिधी-
आमदार दिपक केसरकर यांनी वेंगुर्ले तालुक्यातील ग्राम विलगीकरण कक्षासाठी आमदार निधीतून 140 बेड दिले असून या बेडचे वितरण मंगळवारी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या हस्ते करण्यात आले.
या बेडचे वितरण मंगळवारी प्राथमिक स्वरूपात 17 ग्रा. पं. ना करण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, प्रभारी गट विकास अधिकारी विदयाधर सुतार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. माईणकर, नितीन मांजरेकर, दाभोली सरपंच उदय गोवेकर, अजय नाईक, सुनिल डुबळे, सचिन वालावलकर, बाळा दळवी, पंकज शिरसाट, सुकन्या नरसुले, मंजुषा आरोलकर, आदी उपस्थित होते.