कडक लॉकडाऊनच्या नियमांसोबत अन्य घडामोडींचा प्रभाव
मुंबई
भारतीय रेल्वेच्या कॅटरिंग आणि टुरिझम कंपनी आयआरसीटीसीने चौथ्या तिमाहीचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये जानेवारी ते मार्च या दरम्यान जवळपास 103.78 कोटी रुपयाचा नफ कंपनीला झाला आहे. मागील वर्षातील चौथ्या तिमाहीत हा आकडा 135.14 कोटी रुपयावरुन 23 टक्के कमी राहिला असल्याची माहिती आहे.
कोरोना कालावधीत कठोर निबर्धं लागू केले असल्याने कंपनीचा मुख्य व्यवसायावर परिणाम झाला आहे. कारण याच दरम्यान प्रवासातील अन्नपदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली होती. एक्सचेंज डाटाच्या आधारे आयआरसीटीसी कॅटरिंग व्यवसायातून मिळणारा महसूल हा जवळपास 70 टक्क्यांनी घटून 67.38 कोटी रुपयावर पोहोचला आहे. याच्या आधारे टुरिझ्म विक्री 69 टक्क्यांनी घसरुन 31.6 कोटी रुपयावर राहिली आहे. तसेच इंटरनेट तिकीटचा व्यवसायातही काहीशी वाढ राहिली आहे. हा आकडा वर्षाच्या आधारे 9.5 टक्क्यांनी वाढून 212 कोटीवर राहिला.
ऑपरेशन महसूलात तेजी
ऑपरेशनमधून मिळणाऱया महसूलात मार्च तिमाहीत 41 टक्क्यांनी घटून 340 कोटी रुपयावर राहिला आहे. जो आकडा मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तिमाहीत 576 कोटीवर राहिला होता.