नवी दिल्ली
इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) आपली देशातील पहिली क्रूझ लायनर आजपासून(18 सप्टेंबरपासून) सुरु करणार आहे. आयआरसीटीसीने खासगी कंपनी कॉर्डेलिया क्रूझसोबत करार केला आहे. या लक्झरी क्रूझसोबत आयआरसीटीसी पर्यटकांना केरळ, गोवा आणि लक्षद्वीपचा प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. आयआरसीटीसीच्या पॅकेजमध्ये नाव केरळ डिलाइट क्रूझ टूर असे ठेवण्यात आले असून यामध्ये पाच रात्री व सहा दिवस प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. सदरच्या प्रवासात कोलकाता ते मुंबई आणि कोची ते कोलकातासाठी फ्लाइट मिळणार आहे. कोचीमध्ये एक रात्र हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा मिळणार आहे. यासह अन्य स्वरुपाच्या विविध सेवा पर्यटकांना उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे.