बेळगाव : जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी डॉक्टर, शास्त्रज्ञ व इतर अनेक जण मोठे प्रयत्न करत आहेत. लवकरच कोरोना प्रतिबंधक लसही उपलब्ध होईल. मात्र तोपर्यंत सर्वांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) बेळगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी केले. आयएमएतर्फे आयएमए हॉल येथे शुक्रवारी धन्वंतरी पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अनिल पाटील बोलत होते. ते म्हणाले, रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांनी सतर्क राहून व खबरदारी घेऊन सेवा बजावण्याची गरज आहे. यावेळी संपूर्ण विश्व कोरोनातून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी सेक्रेटरी डॉ. देवेगौडा, डॉ. राजश्री अनगोळ, डॉ. रविंद्र अनगोळ यांच्यासह डॉक्टर उपस्थित होते. डॉ. अनिल पाटील यांनी आभार मानले.
Previous Articleदेशात 44,684 नवे कोरोना रुग्ण
Next Article लोकमान्य ग्रंथालयात अक्षरछाया दिवाळी अंकाचे प्रकाशन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.