प्रतिनिधी / बेळगाव :
केएलई सोसायटीच्या आरएलएस कॉलेजला उत्कृष्ट एनसीसी विभाग या किताबाने गौरविण्यात आले आहे. कर्नाटका आणि गोवा संचालनालयातर्फे कॉलेजच्या एनसीसी एअरव्हींग युनिटला हा बहुमान मिळाला आहे. बेळगावमध्ये 95 संस्थांमध्ये एनसीसी विभाग आहे. या सर्व विभागातून कॉलेजने हा बहुमान पटकाविला आहे.
बेंगळूरच्या ख्रिस्त विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात कर्नाटक आणि गोवा विभागाचे एनसीसीचे डेप्युटी डायरेक्टर जनरल एअर कमोडोर ललीतकुमार जैन यांच्या हस्ते कॉलेजला पुरस्कार देण्यात आला. याबद्दल संस्थेचे चेअरमन प्रभाकर कोरे, कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रा. व्ही. डी. यलमळ्ळी, पीयु विभागाचे एस. जी. नंजप्पन्नवर, एनसीसी अधिकारी व्ही. सी. कामगोळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.