नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) गुजरातच्या मुंदडा ते हरियाणामधील पानीपतपर्यंत कच्चे तेल वाहून नेण्यासाठी नवीन पाईपलाईन घालण्याच्या तयारीत आहे. याकरिता कंपनी जवळपास 9,028 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पांतर्गत मुंदडामध्ये कच्च्या तेलाचे भांडार उभारण्यासाठी 9 टँकची निर्मिती करणार असून प्रत्येक टँकची क्षमता ही जवळपास 60,000 किलोमीटर राहणार आहे. यासंबंधी आवश्यक त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यात येणार असून आगामी काळातही तेल साठवण्याची क्षमता मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे संकेत आहेत. सदरच्या गुंतवणूक प्रस्तावाला 20 डिसेंबर रोजी कंपनीच्या झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.