प्रतिनिधी /पणजी
आयडीपी, या आंतरराष्ट्रीय शिक्षण सेवा देणारी जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी असून कंपनी ने आज संपूर्ण भारतात एकाच वेळी 23 कार्यालये सुरू करून नवीन इतिहास रचला आहे. ही नवीन कार्यालये गांधीनगर, आणंद, रायपूर, शिमला, कुरूक्षेत्र, जम्मू, त्रिची, त्रिचूर, पाटणा, गुवाहटी, कलिकत, आग्रा, जोधपूर, कानपुर, वाराणसी, प्रयागराज, मेरठ, हुबळी, वारंगळ, तिरुपती, काकीनाडा, गोवा आणि नाशिक येथे सुरू करण्यात आली आहेत. या नवीन प्रगतीमुळे आयडीपीची आता भारतातील 60 शहरांमध्ये 67 कार्यालये झाली आहेत. या व्यतिरिक्त आयडीपी ची भारतात 24 व्हर्च्युअल कार्यालये असून या माध्यमातून विद्यार्थी आता देशाच्या कोणत्याही कानाकोपऱयातून आयडीपी तज्ञांशी संपर्क साधू शकतील.अतिशय वेगाने वाढण्याच्या योजना कार्यान्वति करत आयडीपी ने नेहमीच भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार करण्यास कटिबध्दता दर्शवली आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयडीपी ने आणखी एक पाऊल पुढे टाकत आता त्यांची कौशल्ये ही टिअर 2 आणि टिअर 3 शहरात पसरवले असून यांत राज्यांतील राजधान्यांसह देशातील शैक्षणिक दृष्टय़ा महत्त्वपूर्ण जागांचा समावेश आहे.
या कार्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील सल्लामसलत सेवा व्हर्च्युअल तसेच वैयक्तिक पध्दतीने उपलब्ध होणार असून या नवीन कार्यालयांतून ऑस्ट्रेलिया, यूएसए, यूके, कॅनडा, न्य?झिलंड आणि आयर्लंड मधील विद्यापीठात शिक्षण घेणे शक्मय होणार आहे. या नवीन कार्यालयात कार्यरत असलेल्या स्टडी ?ब्र?ड एक्सपर्ट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अगदी कोर्सची तसेच विद्यापीठाची निवड करणे, अर्ज जमा करणे, ऑफर स्विकारणे, विजा सहाय्य, राहण्यासाठी मदत, आरोग्य विम्यासाठी मदत, बँक अकाऊंट उघडणे इत्यादी सेवा देऊ केल्या जातात व या सेवा परदेशातील संपूर्ण अभ्यासाच्या प्रवासात देऊ केल्या जातात. यावेळी बोलतांना आयडीपी एज्युकेशन चे रिजनल डायरेक्टर (दक्षिण एशिया आणि मॉरिशियस) श्री पियुष कुमार यांनी सांगितले ” भारतात आमच्या 23 नवीन कार्यालयांची सुरूवात करतांना आंम्हाला आनंद होत आहे. जागतिक स्तरावरील एक आघाडीची कंपनी म्हणून आम्ही नेहमीच संपूर्ण भारतात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय अनुभव देऊ करत आहोत. यावेळी आम्ही आमची पोहोच ही संपूर्ण देशातील अगदी अंतर्गत भागात असलेल्या टिअर2 शहरांत वाढवत आहोत. आमच्या तज्ञांचा सल्ला देशातील प्रत्येक ठिकाणी नेऊन अनेक विद्यार्थ्यांना योग्य घटक आणि माहिती देऊन सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
ते पुढे म्हणाले ” आम्ही विद्यार्थ्यांना प्राधान्य देत विद्यार्थी केंद्रीत दृष्टिकोन वापरून त्यांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने हे पाऊल टाकले आहे.”आयडीपी हे नाव परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना सहकार्य करणारी संस्था म्हणून प्रसिध्द असून त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना त्यांचे आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि करियर चे लक्ष्य पूर्ण करणे शक्मय होते. गेल्या 50 वर्षांत आयडीपी ने अर्धा दशलक्षांहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील संस्था?मध्ये स्थापित करून त्यांना त्यांच्या आवडीच्या संस्थेत संधी दिली आहे. या संस्था?ची शिफारस 10 पैकी 9 विद्यार्थ्यांनी केलेली आहे.