7333.55 सेंटीमीटर लांबी होती नखे : गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती नोंद
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या सोशल मीडिया पेजवर एक वृत्त प्रसारित झाले आहे. यानुसार मागील 30 वर्षांपासून सर्वाधिक लांब नखांचा विक्रम नोंदविणाऱया आयना विलियम्सने स्वतःची नखे अखेर कापली आहेत. ही महिला अमेरिकेच्या टेक्सास येथे राहते. आयनाच्या लांब नखांना टेक्सासमधील डॉक्टर एलिसन रेडिंगर यांनी इलेक्ट्रिक रोटरी टूलच्या मदतीने कापले आहे. आयनाच्या नखांची लांबी 733.55 सेंटीमीटर इतकी होती. 2017 मध्ये आयनाने लांब नखांमुळे गिनिज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये स्वतःचे नाव नोंदविले होते. तिच्या नखांवर दोन बाटल्या नेल पॉलिश लागत होते आणि त्यांना मेनिक्योर करण्यास 20 तासांचा कालावधी लागत होता. माझी नखे लांब राहिली असो किंवा नसो तरीही मी क्वीनच राहणार आहे. मी या नखांना तयार केले होते असे तिने गिनिज बुकला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. मागील 30 वर्षांदरम्यान स्वतःच्या नखांची काळजी घेत आयनाने कधीच भांडी धुतली नव्हती तसेच कधीच स्वतःच्या हाताने बेडशीट बदलली नव्हती.