प्रतिनिधी / पणजी
लॉकडाऊनच्या काळात पणजी मार्केटमधील भाजीपाला विक्रेत्यांना मार्केट बंद ठेवण्यात आल्यानंतर त्यांना व्यवसाय करण्यासाठी आयनॉक्स रस्त्यावरील जागा उपलब्ध करुन देण्यात आली होती. परंतु आता आजपासून या सर्व विक्रेत्यांना परत मार्केटमधील त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी बसण्यात देण्यात आहे. अशी माहीती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.
भाजीपाला विक्रेते मूळ ठिकाणी बसल्यानंतर देखील शारिरीक दूरी, सॅनीटायझर, व मास्क हे नियम पाळून लोकांना मार्केटमध्ये सोडण्यात येणार आहे. तसेच सध्या मार्केटचे एकच प्रवेशद्वार खुला होता, परंतु आता आणखी एक प्रवेशद्वार खुले करण्यात येणार आहे. असेही मडकईकर यांनी सांगितले.
पाऊस सुरु झाल्या असल्यामुळे आयनॉक्स जवळील रस्ता अधिक धोकादायक बनतो. येथे रस्त्यालागत अनेक मोठी झाडे आहेत. याआधी वादळी पावसामुळे या ठिकाणी झाडे पडलेली आपण पाहीलेली आहेत. या ठिकाणी आतासुध्दा अनेक झाडे धोकादायक ठरु शकते. याचाच विचार करत हा निर्णय घेण्यात आल्याचे उदय मडकईकर यांनी यावेळी स्पष्ट केले.