डुब्लिन
आपला खासगी माहितीसंबंधीचा डाटा अन्य जणांना दिल्याच्या नियमभंगाबद्दल आयर्लंड सरकारने व्हॉटस्ऍपवर दंड आकारणी केली आहे. सदरची आकारणी 266 दशलक्ष डॉलर्सची असल्याचे आयर्लंड सरकारच्या सूत्रांकडून सांगितले जात आहे. व्हॉटस्ऍपवरील या कारवाईमुळे कंपनी पुन्हा चर्चेत आली आहे. यापूर्वीही अशा घटना व्हॉटस्ऍपच्याबाबतीत घडल्या आहेत. आयर्लंडमधील नियामक ‘डाटा प्रायव्हसी कमिशनर’ यांनी व्हॉटस्ऍपवर दंड आकारला आहे. पारदर्शीपणा न राखल्याच्या कारणास्तव नियम भंग केल्याचा आरोप आयर्लंडने केला आहे. व्हॉटस्ऍपने फेसबुकसह इतर कंपन्यांना खासगी माहितीचा डाटा दिला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान व्हॉटस्अपने मात्र याप्रकरणीचा आरोप फेटाळून लावला आहे. 2018 पासूनच्या नियमावलीप्रमाणे सदरच्या देशात व्हॉटस्अप आपले काम करते आहे. माहितीत पारदर्शकता कायम ठेवली असल्याचा दावाही केला आहे.