ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) अर्थात आयसीएसई (ICSE) बोर्डाचे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल शनिवारी 24 जुलै रोजी दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर www.cisce.org किंवा www.results.cisce.org येथे विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी :
- काउन्सिलच्या www.cisce.org किंवा www.results.cisce.org या संकेतस्थळावर जावे.
- होमपेजवर ‘Results 2021’ या लिंकवर क्लिक करा.
- आता दहावी किंवा बारावी यापैकी पर्याय निवडावा.
- आता विद्यार्थ्यांनी त्यांचा युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅपचा आदी माहिती भरून लॉगइन करावे.
- निकाल पाहण्याच्या आणि प्रिंट आऊट काढण्यासंदर्भातील सूचना वेब पेजवर दिलेल्या असतील.
शाळांना आयसीएसई बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरील Careers पोर्टलवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी शाळा मुख्याध्यापकांचा लॉगइन आयडी आणि पासवर्ड आवश्यक असेल.