अतिक्रमणाची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याची सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील वषी झालेल्या पावसामुळे शहर व उपनगरांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. नाल्यांची स्वच्छता न केल्यामुळे आणि झालेल्या अतिक्रमणांमुळेच पूर परिस्थिता निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. यामुळे महानगरपालिका प्रशासनाने यंदा नालासफाई मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली असून, याची पाहणी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी शुक्रवारी केली. अतिक्रमणांची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा आदेश आयुक्तांनी लघु पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱयांना दिला आहे.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसात टिळकवाडी भागात पाणीच पाणी झाले होते. मराठा कॉलनी, महात्मा गांधी कॉलनी, वडगाव साई कॉलनी, नानावाडी, इंद्रप्रस्थ नगर, शांती कॉलनी, शास्त्रीनगर, समर्थनगर, शिवाजीनगर अशा विविध भागात पाणी साचून राहिल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. तसेच पावसाचा जोर कायम राहिल्याने या भागातील रस्ते पाण्याखाली गेले होते. नाल्याची स्वच्छता व्यवस्थित झाली नसल्याने तसेच ठिकठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पावसाळय़ापूर्वीच महानगरपालिकेने नाला स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. पण हे काम व्यवस्थित झाले नाही. तसेच नाला स्वच्छता मोहीम दिखाऊपणाची असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. याबाबत मनपाच्या काही अधिकाऱयांनी नाला स्वच्छतेबाबत जनतेची दिशाभूल केली होती. त्यामुळे याची दखल महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी घेतली आहे.
महापालिकेने केलेल्या नाल्यांच्या स्वच्छतेची पाहणी शुक्रवारी केली. कोनवाळगल्ली, नानावाडी, बळ्ळारी नाला, नागझरी नाला, जक्केरी नाला अशा विविध नाल्यांची पाहणी केली. कचऱयामुळे आणि अतिक्रमणामुळे 30 फुटाचा नाला 10 फुटाचा बनला आहे. ही बाब निदर्शनास आल्याने शक्मय असलेल्या ठिकाणी नाल्यांची रुंदी वाढविण्याची सूचना आयुक्तांनी केली होती. याची पाहणी शुक्रवारी केली. नाल्यांची स्वच्छता व्यवस्थित केली आहे का? याची प्रत्यक्ष पाहणी करून महापालिकेच्या अभियंत्यांना विविध सूचना केल्या.
यंदा पावसाळय़ात कोणत्याही ठिकाणी पाणी साचणार नाही या दृष्टीने स्वच्छता करून अडथळे हटविण्याचा आदेश अभियंत्यांना बजावला. तसेच अतिक्रमणांबाबत सर्वेक्षण करण्यासाठी भूमापन खाते आणि लघु पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱयांना सूचना केल्या. अतिक्रमणाची माहिती घेऊन अहवाल तयार करण्याची सूचना आयुक्त जगदीश के. एच. यांनी मनपा अधिकाऱयांना केली.