वाहनचालकांकडून नियम मोडल्याने कारवाईचा बडगा : करासह दंड मिळून 7 कोटींहून अधिक रक्कम जमा, कारवाईमुळे वाहनधारकांचेही धाबे दणाणले
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव आरटीओ कार्यक्षेत्रात साधारणतः 6 लाखाहून अधिक वाहने आहेत. त्यामध्ये दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांचा समावेश आहे. भरमसाट वाहनांची वर्दळ असून नियमांचे मात्र तीनतेरा होत आहेत. त्यामुळेच आरटीओ कार्यालयाकडून नियम मोडणाऱयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. या कारवाईमुळे सरकारच्या खजिन्यात मोठी भर पडली असून केवळ कर आणि दंड अशी मिळून 7 कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे आरटीओंनी केलेल्या कारवाईच्या बडग्यामुळे वाहनधारकांचेही धाबे दणाणले आहेत. नियमांची पायमल्ली करणाऱयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
बेळगावमध्ये वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. 2020-21 आणि 2021-22 सालात आतापर्यंत एकूण 7 कोटी 16 लाख 22 हजार 530 रुपयांचा कर आणि दंड वसूल करण्यात आला आहे. मागील वषीपेक्षाही यावषी मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्यात आली असून सरकारच्या तिजोरीतही कर स्वरूपात रक्कम जमा झाली आहे. बेळगाव आरटीओ कार्यक्षेत्रात 2020-21 सालात कर म्हणून 2 कोटी 77 लाख 92 हजार 16 रुपये जमा झाले असून दंड म्हणून 44 लाख 56 हजार 681 रुपये वसूल केले आहेत.
कोरोनामुळे अनेक उद्योगधंद्यांना फटका बसला आहे. यामध्ये सरकारी कार्यालयेही अपवाद नाहीत. त्यामुळे कधी एकदा कोरोनाचे उच्चाटन होते, असेच साऱयांना वाटू लागले आहे. आरटीओ कार्यालयाकडून 2020-21 सालात वाहनचालकांकडून दंड आकारणी करण्यात आली नाही. आता मात्र वाहनचालकांनी नियम मोडल्यास दंड आकारण्यात येत आहे.
वाहनांवर नंबर प्लेट नसणे, हेल्मेट नसणे, वाहन परवाना नसणे, वाहनाचा विमा नसणे, वाहनांची मुदत संपणे यासह इतर नियम मोडणाऱयांकडून हा दंड आकारण्यात आला आहे. मागील वषीपेक्षा म्हणजेच यावषी दहा महिन्यांत मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. 2021-22 सालात 3 कोटी 34 लाख 38 हजार 187 कर तर 59 लाख 35 हजार 646 रुपये दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील अधिकारी सुसाट आणि वाहनधारक मात्र कचाटय़ात, अशी अवस्था झाली आहे.
6 लाख 5 हजार 421 वाहने रस्त्यावर
सध्या बेळगाव आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 6 लाख 5 हजार 421 वाहने रस्त्यावर धावत आहेत. त्यामधील मालवाहतूक न करणारी 5 लाख 62 हजार 554 वाहने आहेत. बेळगाव आरटीओ कार्यक्षेत्रात चारचाकी, दुचाकी वाहने मोठय़ा प्रमाणात आहेत. आरटीओ कार्यक्षेत्रात बेळगाव आणि खानापूर तालुक्मयाचा समावेश आहे. चारचाकी, दुचाकी, रिक्षा आणि इतर अवजड वाहनांचा समावेश आहे. 42 हजार 867 वाहने अवजड व लघु अवजड वाहतूक वाहने आहेत. याचबरोबर दुचाकींची संख्या 4 लाख 81 हजार 588 इतकी आहे. अवजड वाहतूक करण्यासाठी तब्बल 9 हजार 426 वाहने आहेत. मध्यम गुड्स वाहतूक करणारी 9 हजार 910 वाहने असून ऑटोरिक्षा व मॅक्सिकॅब अशी एकूण 7 हजार 897 वाहने आहेत. याचबरोबर परराज्यातून येणाऱया वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे.
नियमबाहय़ वाहनांवर कारवाई करणारच- आरटीओ शिवानंद मगदूम
कोरोनाकाळात आरटीओ विभागाने थोडी विश्रांती घेतली होती. तिसरी लाट ओसरल्याने आता पुन्हा कारवाईला जोरदार सुरुवात करण्यात येणार आहे. नियमबाहय़ वाहनचालकांवर कारवाई सुरूच ठेवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनीही नियमांचे उल्लंघन न करता वाहन परवाना, वाहनांचे विमा व इतर नियम पाळावेत, असे आवाहन त्यांनी केले.
2020-21 सालात जमा झालेला कर व आकारण्यात आलेला दंड
महिना | कारवाई केलेल्या वाहनांची संख्या | जमा करण्यात आलेला कर | वसूल करण्यात आलेला दंड | एकूण |
एप्रिल | 11 | 59914 | 5110 | 65024 |
मे | 213 | 2130028 | 301586 | 2431614 |
जून | 349 | 3920841 | 436878 | 4357719 |
जुलै | 221 | 3063496 | 494085 | 3557581 |
ऑगस्ट | 147 | 2625971 | 419927 | 3045898 |
सप्टेंबर | 186 | 3053852 | 4914492 | 3545344 |
ऑक्टोबर | 165 | 649147 | 112803 | 761950 |
नोव्हेंबर | 147 | 470521 | 84823 | 555344 |
डिसेंबर | 168 | 3506369 | 624384 | 4130753 |
जानेवारी | 112 | 2935332 | 525143 | 3460475 |
फेब्रुवारी | 108 | 2502390 | 447728 | 2950118 |
मार्च | 129 | 2874155 | 512722 | 3386877 |
एकूण | 1956 | 27792016 | 4456681 | 32248697 |
2021-22 सालातील एप्रिल ते जानेवारीपर्यंतची आकडेवारी
महिना | कारवाई केलेल्या वाहनांची संख्या | जमा करण्यात आलेला कर | वसूल करण्यात आलेला दंड | एकूण |
एप्रिल | 408 | 3691083 | 629459 | 4320542 |
मे | 50 | 469185 | 79069 | 548254 |
जून | 153 | 1700538 | 271207 | 1971745 |
जुलै | 280 | 4382606 | 689210 | 5071816 |
ऑगस्ट | 259 | 4398338 | 805858 | 5204196 |
सप्टेंबर | 229 | 4200687 | 741067 | 4941754 |
ऑक्टोबर | 224 | 3450736 | 639707 | 4090443 |
नोव्हेंबर | 211 | 3974642 | 743694 | 4718336 |
डिसेंबर | 172 | 4327469 | 814043 | 5141512 |
जानेवारी | 124 | 2842903 | 522332 | 3365235 |
एकूण | 2110 | 33438187 | 5935646 | 39373833 |