प्रतिनिधी /निपाणी
राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक नियमांतर्गत आंतरराज्य प्रवासावर घातलेले निर्बंध कायम आहेत. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी येथील तपासनाक्मयावर आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल असेल तरच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. अशावेळी या नियमातून पळवाट काढत आडमार्गाने कर्नाटकात प्रवेश करणाऱया दोन खाजगी बसेसविरोधात मंगळवारी पहाटे निपाणी ग्रामीण व शहर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये बसेसचे चालक, मालक व आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल नसणाऱया प्रवाशांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईहून बेंगळूरला निघालेल्या शर्मा ट्रव्हल्सच्या बसमध्ये (क्र. केए 51 एडी 0277 ) 28 प्रवासी प्रवास करत होते. या 28 प्रवाशांपैकी 24 प्रवाशांकडे आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल नव्हते. तसेच नॅशनल ट्रव्हल्सची बस (क्र. केए 51 ए एफ 6652) मुंबईहून बेंगळूरकडे निघाली होती. यामधील 28 प्रवाशांपैकी 17 प्रवासी आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्राशिवाय प्रवास करत होते.
या दोन्ही ट्रव्हल्सच्या बसेस कोगनोळी तपासनाका चुकवून कागल, शेंडूर, आप्पाचीवाडीमार्गे पुन्हा राष्ट्रीय महामार्गाकडे येत होत्या.
याचवेळी एक बस आप्पाचीवाडी फाटय़ानजीक निपाणी ग्रामीण पोलिसांनी तर दुसरी बस निपाणी शहर पोलिसांनी अडवून त्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांना या दोन्ही बसमधील एकूण 56 प्रवाशांपैकी 41 जणांकडे आरटीपीसीआर अहवाल नसल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर ट्रव्हल्सच्या बसचे चालक, मालक व प्रवाशांविरोधात कर्नाटक संसर्गजन्य रोग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.