प्रतिनिधी /बेळगाव
सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या आराधना विशेष मुलांच्या शाळेमध्ये कनकदास जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी कनकदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा केली. याप्रसंगी रशीद मारुती कुंभार, द्वारका पाटील, किशोर जुवेकर, नंदा लोहार, अश्विनी पवार व शिक्षक उपस्थित होते.