वार्ताहर / कास :
परळी आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या डोंगरी भागातील धावली आरोग्य उपकेंद्रात प्रथम आठ वर्ष पदभार व पुढील पाच वर्ष तात्पुरता ( डेपोडेशन) वर गेली तेरा वर्षाहुन आधिक काळ कार्यभाग सांभाळणाऱ्या आरोग्य सेविका गितांजली नलवडे यांची नुकतीच बदली करण्यात आली. ही बदली रद्द होऊन पुन्हा याच केद्रांवर त्यांची कायमस्वरूपी नियक्ती व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरीकांनी प्रशासनासह आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली. मात्र, अद्याप बदली रद्द न झाल्याने धावली उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या नागरीकांनी सोमवारी कोविडच्या लसीकरणावर बहिष्कार टाकला. तसेच तेथील कर्मचाऱ्यांना निवेदन देऊन गितांजली नलवडे यांनाच लस घेऊन पाठवा अन्यथा लसीकरण न करून घेण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला.
धावली आरोग्य उपकेंद्र हे डोंगरी व दुर्गम भागात असून धावली, जुंगटी, भांबवली, तांबी पाली, जळकेवाडी, केळवली, वाजंळवाडी कासाणी, घाटवण आदी गावात गेल्या तेरा वर्षापेक्षा अधिकच्या कार्यकाळात नलवडे यांनी केलेली उल्लेखनिय कामगीरी, लोकांची केलेली आरोग्य सेवा वाखण्याजोगी असून, त्यांनी कोणत्याही प्रसंगी रात्री अपरात्री गावात जाऊन सेवा दिल्याने लोकांशी जिव्हाळ्याचा संपर्क निर्माण केला. त्यांची झालेली बदली नागरीकांना रूचेणाशी झाली असुन, त्यांची बदली रद्द होण्यासाठी स्थानिकांनी पंचायत समीतीपासुन ते मंत्रालयापर्यंत निवेदने दिली आहेत.