पुणे / वार्ताहर :
मोकाअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात येरवडा जेलमधील एका आरोपी डॉक्टरने कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी जामीन अर्ज दाखल केला होता. आज कोर्टाने तो जमीन अर्ज मंजूर केला आहे. संबंधित डॉक्टरला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी कोर्टाने 60 दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर केला. मोका कोर्टाचे विशेष न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
डॉ. इंद्रकुमार देवराव भिसे (वय 52, रा. शिरुर, पुणे) असे या डॉक्टराचे नाव आहे. येरवडा जेलमध्ये असलेल्या डॉ. भिसे यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची इच्छा असून त्यासाठी जामीन मिळावा म्हणून ड. पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत कोर्टात अर्ज दाखल केला होता. जामिनाच्या सुनावणीला डॉ. भिसे हे येरवडा जेलमधून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे कोर्टासमोर हजर झाले होते.