परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
प्रतिनिधी/मुंबई
आर्थिक अडचणी मध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाला राज्य सरकार 600 कोटी रुपयांची मदत देणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री ऍड अनिल परब यांनी दिली आहे. यामुळे एसटीच्या 98 हजार कर्मचार्यांचे रखडलेले वेतन देणे शक्य होणार आहे.
करोना महामारी मुळे राज्यात 15 एप्रिल पासून दुसर्यांदा टाळेबंदी लागू करण्यात आली. एसटीला केवळ अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणार्या प्रवाशांसाठी फक्त 50 टक्के आसन क्षमतेने बसेस चालू ठेवण्याचे बंधन घातले होते. त्यामुळे एसटीची वाहतूक मंदावली होती. त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या तिकीट महसुलावर झाला होता. गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत तुटपुंजे उत्पन्न कसेबसे एसटी महामंडळाला मिळत होते. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवने देखील एसटीला शक्य नव्हते. यासाठी मंत्री परब यांनी एसटी महामंडळातर्पे सरकारकडे आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर केला होता.त्यानुसार कर्मचाल्ल्यांचे वेतन व इतर दैनदिन खर्चासाठी 600 कोटी रुपये पहिल्या टप्यात देण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केले. त्यामुळे आर्थिक दृष्टÎा अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला थोडा दिलासा मिळाला आहे. या बैठकीला मा. परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, अर्थ व नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, परिवहन विभाचे अप्पर मुख्य सचिव व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष् तसेच व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.