स्टेट बँकेच्या अहवालामधून माहिती सादर
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया(एसबीआय) यांच्याकडून देशातील आर्थिक विकास वाढीचा दर (जीडीपी) यापूर्वी 5 टक्क्यांवर राहणार असल्याचे अनुमान निश्चित केले होते. परंतु त्यात काही प्रमाणात घट नेंदवत ही वाढ 4.6 टक्क्यांवर राहणार असल्याचा अंदाज मांडला आहे. ही माहिती एसबीआयने आपल्या सादर केलेल्या अहवालातून दिली आहे.
नोव्हेंबरमध्ये आम्ही जीडीपी वाढीचा दर 5 टक्क्यांवर राहणार असल्याचे अनुमान नोंदवले होते. परंतु त्यात सध्या घट नेंदवत हा दर 4.6 टक्क्यांवर करत असल्याचे मांडले आहे. सदरचा अहवाल हा फक्त दोन महिन्यांसाठी राहणार असल्याचेही एसबीआयने स्पष्ट केले आहे.
सीएसओचा अहवाल सादर
मंगळवारी सेंट्रल स्टॅटिस्टिक्स
कार्यालयाकडून(सीएसओ) आर्थिक वर्ष 2019-20 साठी देशाचा जीडीपी वाढीचा दर 5 टक्क्यांवर राहणार असल्याचे अनुमान नोंदवले आहे. हा दर मागील 11 वर्षांतील सर्वात कमी दर असल्याचेही यावेळी सीएसओने म्हटले आहे. मागील आर्थिक वर्षात जीडीपी 6.8 टक्के होता हे नमूद केले आहे.