प्रतिनिधी/ बेळगाव
जायंटस् ग्रुप ऑफ बेळगाव परिवारतर्फे दि. 13 रोजी आर्ष विद्यामंदिर, मंडोळी रोड येथे संक्रांत साजरी करण्यात आली. जायंटस्तर्फे सर्वांना तिळगुळ देण्यात आले. तसेच केंद्रातील मुलांना सौंदर्य प्रसाधने आणि आभूषणे यांचा कीट देण्यात आला. प्रारंभी सामूहिक प्रार्थना म्हणण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष श्रीधन मलिक व राजू माळवदे, किरण वेसणे, प्रवीण त्रिवेदी, विजय खोत, प्रदीप हिरेमठ, उमेश गावडे आदी उपस्थित होते.