बेळगाव : / प्रतिनिधी
देशात कोरोनाने हाहाकार माजविला असून या संकटकाळात पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, याबरोबर अशा कार्यकर्त्या कोरोना योद्धा म्हणून सेवा बजावत आहेत. राज्यभर 42 हजार अशा कार्यकर्त्यां कार्य करत असून त्यांना राज्य सरकारने गौरव धन व केंद्र सरकारने प्रोत्साहन धन म्हणून मासिक 12 हजार रुपये मानधन द्यावे, अशा मागणीचे निवेदन आशा कार्यकर्त्यांनी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे दिले.
आशा कार्यकर्त्या कोरोनाच्या संकट काळात आपला जीव धोक्मयात घालून सेवा बजावत आहेत. मात्र त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांना अडचणी निर्माण होत आहेत. यापूर्वी 4 हजार गौरव धन व 5 हजार प्रोत्साहन धन देण्याचे निश्चित झाले होते. मात्र अद्याप अंमलबजावणी झाली नसल्यामुळे आशा कार्यकर्त्यांना वाढीव मानधनापासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे आशा कार्यकर्त्यांना तातडीने 12 हजार मानधन देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.