जागतिक बँकेच्या आर्थिक अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोना महामारीच्या कारणामुळे आशियातील 1967 नंतर सर्वात कमी सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) दर राहणार असल्याचे संकेत आहेत. यामध्ये 0.9 टक्क्मयांच्या जवळपास जीडीपी प्रभावीत राहणार असल्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.
जागतिक बँकेने ही माहिती देताना कोरोनामुळे चालू वर्षात पूर्व आशिया आणि आशिया पॅसिफिकमध्ये मागील 50 वर्षात सर्वात कमी विकासदर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. महामारीच्या कारणाने पूर्व आशिया आणि प्रशांत क्षेत्रासोबत चीनची अर्थव्यवस्थाही यावेळी मंदी वृद्धीदरासोबत राहणार असल्याचे म्हटले आहे.
पूर्व आशिया आणि प्रशांत क्षेत्रातील अन्य हिस्सेदारीत जीडीपीचा दर हा 3.5 टक्क्मयांनी घसरण्याची शक्यता आहे. महामारी आणि त्याचा प्रसार थांबविण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे आर्थिक गतीला वाव मिळतो आहे. सदर देशांमध्ये महामारीसह आर्थिक व वित्तीय प्रभावातून महसूल जमा करण्यासाठी वित्तीय योजनांच्या कार्यवाहीवर भर देण्याची चर्चा या अहवालात मांडली आहे.