वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओमान, मस्कतमध्ये 20 जानेवारीपासून खेळविल्या जाणाऱया लिजेंडस् लिग क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱया आशिया लायन्स संघात बांगलादेशचा माजी कर्णधार हबीबूल बशर, लंकेचा फिरकी गोलंदाज अजंता मेंडिस आणि दिलहारा फर्नांडो दाखल झाले आहेत.
पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या स्पर्धेचे जेतेपद मिळविण्यासाठी आशिया लायन्सचा संघ अधिक भक्कम करण्यात आला आहे. आशिया लायन्स संघात पाकचा शाहीद आफ्रिदी, सनथ जयसुर्या यांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये भारत, पाक, लंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. सदर स्पर्धेत तीन संघांचा समावेश आहे. भारत, आशिया लायन्स आणि शेष विश्व अशा तीन संघामध्ये जेतेपदासाठी लढत होईल.