चेन्नई : यजमान भारताविरूद्ध होणाऱया चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट संघाचे बुधवारी येथे आगमन झाले. चेन्नईच्या विमानतळावर इंग्लंड संघातील सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि या चाचणीत ते सर्वजण निगेटिव्ह असल्याचे आढळून आले.
या मालिकेदरम्यान प्रत्येक तीन दिवसांच्या अंतराने क्रिकेटपटूंची कोरोना चाचणी घेतली जाईल. चेन्नईतील लीला पॅलेस येथे भारत आणि इंग्लंड संघांचे जैवसुरक्षित कवचात आगमन झाले आहे. मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली चेन्नईमध्ये अद्याप दाखल झाला नव्हता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी चेन्नईत 5 ते 9 तसेच दुसरी कसोटी 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान चेन्नईत खेळविली जाणार आहे.