वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
देशातील सर्वात मोठी तेल रिफायनरी कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) यांनी आपल्या रिफायनरींमधील उत्पादनाची क्षमता जवळपास 83 टक्क्मयांवर नेली आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. कोविडच्या संकटामुळे व लॉकडाऊनच्या नियमावलीमुळे देशातील इंधनाची मागणी प्रभावीत झाली होती. परंतु आता लॉकडाऊनमध्ये काही मोकळीक दिली गेल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. इंधन मागणीला आता पुन्हा जोर धरू लागला आहे.
सार्वजनिक क्षेत्रातली ही तेलकंपनी असून या कंपनीने मार्चमध्ये आपली उत्पादन क्षमता जवळपास 25 ते 30 टक्क्मयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु बंदच्या काळात पेट्रोलियम पदार्थांची मागणी मोठय़ा प्रमाणात घटली हेती. कंपनीने मे महिन्यापासून हळूहळू उत्पादनात वाढ करण्यास प्रारंभ केला आहे. हा बदल लॉकडाऊनमधील मिळत असणाऱया शिथिलतेमुळे पहावयास मिळत असल्याचे म्हटले आहे.
तेल उत्पादनासाठी आवश्यक असणारे कच्चे तेल आजच्या स्थितीत जवळपास 80 टक्के उपलब्ध केले आहे. यामुळे जवळपास सर्व पेट्रोलियम उत्पादनांची विक्री एप्रिल 2020 च्या तुलनेत मे 2020 मध्ये दुप्पट झाली आहे. मेमहिन्यात वाहनांचा वापर वाढल्याने आपसुकच इंधनाचीही मागणी वाढली असल्याचे समोर आले आहे. कंपनीने म्हटले आहे, की सध्या देशातील नऊ रिफायनरीमधील कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याचे काम सुरु केल्याने मेमध्ये प्रक्रियेचा वेग 55 टक्क्मयांवर होता तर मेच्या समाप्तीपर्यंत 78 टक्के राहिला होता.