जकार्ता
इंडोनेशियाच्या उत्तर मालुकु या प्रांतात मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.0 इतकी होती. स्थाकि प्रमाणवेळेनुसार भूकंपाचा धक्का सकाळी 8.44 वाजता जाणवला आहे. या भूकंपामुळे कुठल्याही प्रकारच्या जीवित-आर्थिक हानीचे वृत्त अद्याप मिळालेले नाही. फेब्रुवारी महिन्यात इंडोनेशियाच्या सुमात्रा प्रांतात 6.1 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे 10 जणांना जीव गमवावा लागला होता. तर सुमारे 13 हजार लोक विस्थापित झाले होते.