प्रतिनिधी/ सातारा
पेट्रोल डिझेल, तसेच घरगुती गॅसचे वाढत्या दराने सर्व सामान्य जनता हैराण झाली आहे. त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. केंद्र सरकारची धोरणे याला कारणीभूत असून केंद्र सरकारच्या विरोधात सातारा जिल्हा काँग्रेसच्यावतीने शुक्रवार दि. 9 जुलै रोजी साताऱयात सायकल, दुचाकी रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांनी दिली.
यावेळी महिला काँग्रेसच्यावतीने गॅस दरवाढ विरोधात गॅस, चूल, व शेणी घेऊन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत जिल्हा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांनी सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस, महिलध्यक्षा, अनु जाती जमातीचे अध्यक्ष, व प्रमुख पदाधिकारी याच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व तालुक्यातील किमान 50 कार्यकर्त्यांनी सायकली व दुचाकी घेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.