ऑनलाईन टीम / कैरो :
पिरॅमिडचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इजिप्तमध्ये अंदाजे 2600 वर्षांपूर्वीच्या 59 ममी आढळून आल्या आहेत. इजिप्तच्या पर्यटन व दुर्मीळ वस्तू मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
साककारा येथील ‘पिरॅमिड ऑफ जॉसर’जवळ उत्खनन करण्यात आले होते. त्यावेळी या ममी आढळून आल्या. तेजस्वी रंगात या हायरोग्लिफिक शिलालेख सारख्या दिसतात. या पेट्या लाकडी आहेत. त्यावर नक्षीकाम करून पेट्या लाल, काळ्या, पांढऱ्या, निळ्या आणि सोनेरी रंगाने रंगविण्यात आल्या आहेत. या शवपेट्यांचे संशोधन करण्याचे काम सुरू झाले आहे.
प्राचीन इजिप्शियन राजधानी कैरोच्या दक्षिणेस, मेम्फिसच्या नेक्रोपोलिस, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या साककारामधील एका मोठ्या दफनभूमीत सापडल्या आहेत. साककारा परिसर 3000 वर्षांपासून मृतदेह गाडण्यासाठी ओळखला जातो. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे.