ऑनलाईन टीम / रोम :
इटलीत आतापर्यंत 20 लाख 09 हजार 317 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामधील 70 हजार 900 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
इटलीत गुरुवारी 18 हजार 040 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 505 जणांचा मृत्यू झाला. 20 लाख रुग्णांपैकी 13 लाख 44 हजार 785 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 5 लाख 93 हजार 632 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2589 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत इटलीचा जगात आठवा क्रमांक लागतो. तर कोरोनाबळींच्या संख्येत सहावा क्रमांक लागतो. इटलीत आतापर्यंत 2 कोटी 57 लाख 52 हजार 360 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.