प्रतिनिधी/ बेळगाव
इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या नूतन अध्यक्षा म्हणून शर्मिला कोरे, सचिव म्हणून मंजिरी पाटील यांची निवड झाली. त्यांचा व पदाधिकाऱयांचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच झूम माध्यमातून पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून मनीषा उपाध्ये उपस्थित होत्या.
प्रारंभी माजी अध्यक्षा स्वाती उपाध्ये यांनी स्वागत केले. तुळसा पाटील यांनी इनरव्हीलची प्रार्थना सादर केली. बेला शिवलकर यांनी संदेश वाचन केले. प्रीती भंडारे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी स्वाती उपाध्ये यांनी 2019-20 ची बक्षीसपात्र नावे जाहीर केली. सक्रिय सदस्य म्हणून सुनीता हणमशेठ, पिलर ऑफ द इयर अवॉर्ड लता कित्तूर यांना तर रायझिंग स्टार अवॉर्ड शिल्पा शाह यांना देण्यात आले. 100 टक्के उपस्थितीबद्दल 11 जणांना बक्षीस देण्यात आले.
स्वाती उपाध्ये यांनी त्यांच्या कार्यकाळातील शेवटचा प्रकल्प म्हणून चन्नम्मानगर शाळेतील दोन विद्यार्थ्यांची फी भरली. भरतेश कॉलेजला ब्लूटूथ हेडफोन, महावीर शाळेला खेळाचे साहित्य तसेच स्वाध्याय विद्या मंदिरच्या दोन व डी. पी. शाळेच्या एका विद्यार्थिनीची फी भरली. माहेश्वरी शाळेतील इयत्ता 9 वीचा विद्यार्थी रवी बेंगल याला अद्वंत पुरस्कार देण्यात आला.
यावेळी बोलताना मनीषा उपाध्ये म्हणाल्या, ध्येय निश्चित असेल आणि तुमची जिद्द असेल तर कोठेही यश प्राप्त करणे शक्मय आहे. कौशल्य आत्मसात केल्याशिवाय यश मिळणे शक्मय नाही. गुणवत्तेला पर्याय नसतो. आपले वेगळे अस्तित्व सिद्ध झाल्यास कोठेही आपल्या बुद्धीची निश्चित कदर होते. त्यांनी पत्रकारितेतील आपले काही अनुभवही सांगितले.
यानंतर नूतन अध्यक्षा शर्मिला कोरे यांनी एका गरजू मुलीच्या फीसाठी प्रकाश बडकुंद्री पुरस्कृत 2 हजार रुपये दिले. एका परिचारिकेच्या प्रवासासाठी पैसे दिले. माजी अध्यक्षा रूपा देशपांडे यांनी कर्करोगग्रस्त महिलेसाठी 5 हजार रुपये दिले. माजी सचिव शालिनी चौगुले यांनी एका गरजू विद्यार्थ्याची फी भरली. उर्मी शेरेगार यांनी नूतन सदस्यांचा परिचय करून दिला. अनुपा रजपूत या लकी लेडी ठरल्या. सूत्रसंचालन डॉ. आसावरी संत यांनी केले. डॉ. सुषमा शेट्टी यांनी आभार मानले. या ऑनलाईन कर्यक्रमात रत्ना बेहरे, योगिनी नाईक, दिव्या मेहता, सुनीता कट्टी, लिना शाह, शालिनी चौगुले आदी सहभागी झाल्या होत्या.