बेंगळूर /प्रतिनिधी
बंगळूरमध्ये असणाऱ्या आयटी कंपनी इन्फोसिसने अमेरिकेत अडकलेल्या २०० पेक्षा जास्त इन्फोसिस कर्मचार्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना खास चार्टर्ड विमानाने परत बंगळूरला आणले आहे. इन्फोसिसचे उपाध्यक्ष समिर गोसावी यांनी सोमवारी लिंक्डइनच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी अमेरिकेत अडकलेल्या २०० कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी गेलेल्या इन्फोसिस चार्टर्ड विमानाने रविवारी रात्री एसएफओ (सॅन फ्रान्सिस्को) येथून उड्डाण केले.
कंपनीने प्रथमच अमेरिकेतून भारतात आलेल्या 200 कर्मचारी व कुटूंबासाठी चार्टर्ड फ्लाइट बुक केलं होत. आम्ही प्रतीक्षा करत असलेलं विमान बंगळूरमध्ये सुरक्षितपणे उतरले, ज्यामुळे अनेक आठवड्यांची कोंडी संपली, असे समिर गोसावी म्हणले.