कोलकाता
सौंदर्यवर्धक उत्पादनांच्या क्षेत्रात कार्यरत कंपनी इमामी लिमिटेडने अलीकडेच हेलिओस लाइफस्टाईलमधील हिस्सा वाढवला आहे. कंपनीने आता आपला हिस्सा 46 टक्के इतका केला आहे. मॅन कंपनीच्या हेलिओस लाइफ स्टाईलमध्ये एफएमसीजी फर्म इमामी लि.ने याआधी 33 टक्के वाटा घेतला होता. गुंतवणुकीमार्फत ही हिस्सेदारी घेतली असून याचा उपयोग संयुक्तपणे व्यवसाय वाढीसाठी होणार असल्याचे मत इमामीने व्यक्त केले आहे.