मुंबई \ ऑनलाईन टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळही उपस्थित होते. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. छगन भुजबळ हे इम्पेरिकल डेटासंदर्भात चर्चा करण्यासाठी आले होते असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी इम्पेरिकल डेटासाठी भुजबळांनी पुढाकार घ्यावा, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असं म्हटलं आहे.
ओबीसी राजकीय आरक्षण संबंधी छगन भुजबळ यांनी आज सकाळी माझी सागर निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. मी या प्रश्नात संपूर्ण मदत करेन, असे सांगितले. आम्ही मराठा आरक्षणावेळी राज्यात एम्पिरिकल डाटा गोळा केला होता. तो सुप्रीम कोर्टानेही मान्य केला. त्यामुळे एम्पिरिकल डाटा कसा गोळा करता येईल, यासंदर्भातील आम्ही चर्चा केली. आमच्यासाठी हा राजकीय प्रश्न नाही. मी एक स्वतंत्र नोट तयार करून देतो. या प्रश्नात भुजबळ यांनी पुढाकार घ्यावा. त्यांच्यासोबत मिळून काम करण्यास आम्ही तयार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विधानसभेचं पावसाळी अधिवेशन पाच आणि सहा तारखेला दोन दिवसांचं झालं. त्यावेळीही याच विषयावर चर्चा झाली होती. त्यावेळी भुजबळांनी प्रस्ताव मांडला होता, त्यावेळी विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली होती. यानंतर भाजपने चक्का जाम आंदोलनाची हाक दिली. मात्र भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याची ऑफर देत, ते आमचे बॉस आहेत हवे तर सर्व श्रेय त्यांनी घ्यावे पण आमचे आरक्षण वाचवावे असे सांगितले. मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा फडणवीस यांनी केंद्राकडून डाटा आणून द्यावा. आमचे सरकार त्या आधारे इम्पिरिकल डाटा तयार करून दोन महिन्यांत आरक्षण देईल असेही भुजबळ म्हणाले. त्यामुळे फडणवीस यांनी पुढाकार घेवून केंद्राकडून डाटा आणावा याकरीता आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. केंद्राने लगेच डाटा दिला तर दोन महिन्यांत सरकार हे आरक्षण पुन्हा बहाल करून दाखवेल असे आव्हान भुजबळ यांनी दिले. या सर्व पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Previous Articleदुसऱ्या डोससोबत स्वॅब टेस्टींग..!
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.