ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांच्या पर्सनल असिस्टंटला देखील कोरोनाची लागण झाली असल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसची लागण झालेली व्हाईट हाऊसमधील तिसरी व्यक्ती ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इव्हांका ट्रम्प यांच्या व्यक्तिगत सहाय्यकास कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून इव्हांका ट्रम्प यांना ती भेटलेली नाही आहे. कारण मागील दोन महिन्यांपासून दुसरीकडून काम करत होती.
दरम्यान, ही बातमी येताच, इव्हांका ट्रम्प आणि त्यांचे पती जेरेड कुशनर यांनी कोरोना ची टेस्ट करून घेतली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
याआधी गुरुवारी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या सेवेतील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आता आपण दररोज कोरोनाची टेस्ट करणार असे टोम्पे यांनी म्हटले होते.
दरम्यान, अमेरिकेत आत्तापर्यंत जवळपास 13 लाख पेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून तेथील परिस्थिती चिंताजनक आहे.