ऑनलाईन टीम / जेरुसलेम :
इराणने अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांच्या हत्येचा आरोप केल्यानंतर इस्राईलने सुरक्षेच्या कारणास्तव जगभरातील दुतावासांची सुरक्षा वाढवली आहे.
फखरीजादेह इराणचे महत्त्वाचे अणुशास्त्रज्ञ आणि IRGCचे ज्येष्ठ अधिकारी होते. शुक्रवारी त्यांना घेऊन जाणाऱ्या कारला सशस्त्र दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फखरीजादेह यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावरील हल्ल्याचा आरोप इराणने इस्राईलवर केला आहे.
फखरीजादेह यांच्या हत्येचा बदला योग्य वेळी घेतला जाईल, असे इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी म्हटले आहे. त्यामुळे इस्राईलने खबरदारी म्हणून जगभरातील दूतावासांची सुरक्षा वाढवली आहे.