ऑनलाईन टीम / जेरुसलेम :
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार अर्थसंकल्प सादर करण्यात अयशस्वी ठरल्याने संसद बरखास्त करण्यात आली आहे. इस्रायलध्ये दोन वर्षात चौथ्यांदा निवडणूक होणार आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, लिकुड पक्षाचे अध्यक्ष असणाऱ्या नेत्यान्याहू यांनी सात महिन्यांपूर्वीच गेंट्ज यांच्या पाठिंब्याच्या जोरावर देशात सरकार स्थापन केले होते. मात्र, दोन्ही पक्षात मतभेद असल्याने आघाडी सरकार अर्थसंकल्प सादर करण्यात अयशस्वी ठरले. नेतान्याहू यांच्या पक्षासोबत युती करुन सत्ता स्थापन करणारे ब्लू अॅण्ड व्हाइट पक्षाचे नेते बेनी गेंट्ज यांनी एकमेकांना दोष देण्यात सुरुवात केली आहे.
गेंट्ज यांनी नेत्यान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. दरम्यान, 23 मार्च 2021 रोजी इस्रायलमध्ये पुढील निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे.