तेल अवीव / वृत्तसंस्था
इस्रालयची राजधानी तेल अवीवच्या जवळ एका लोकवस्तीत मुंबईतील दहशतवादी हल्ल्यासारखा हल्ला झाला आहे. त्यात किमान 5 नागरीक प्राणांस मुकले आहेत. मुंबई हल्ल्यात अजमल कसाब या दहशतवादद्याने निरपराधी लोकांवर गोळय़ा झाडून त्यांना मारले होते. तसाच हा इस्रायलधील हल्ला होता.
हा हल्ला गेल्या आठवडय़ात झाला होता. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. इस्रायली पोलीस या हल्ल्यानंतर सावध झाले असून त्यांनी देशभरात अशा हल्ले रोखण्यासाठी बळकट यंत्रणा स्थापन करण्यासाठी पावले उचलली आहेत. या देशाचे पंतप्रधान बेनेट यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून देशातून सर्व दहशदवाद्यांचा निःपात करण्याचा निर्धार बोलून दाखविला.
या हल्ल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी सेनाधिकाऱयांची बैठक आयोजित केली होती. त्यात हे प्रकार रोखणे, तसेच दहशतवादचा समूळ नायनाट करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपयांचे पुनरावलोकन करण्यात आले. इस्रायली सेना देशभरात गस्त वाढविणार असून नागरीकांनाही सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. अशा प्रकारचा हा या देशातील प्रथम हल्ला असल्याचे बोलले जाते.