स्पर्ध्येत सुयश मिळवणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी
प्रतिनिधी / नागठाणे
इस्त्राs ( भारतीय अंतराळ संशोधन संस्था) ने देशभरातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ’सायबर टेस्ट कॉम्पिटिशन’मध्ये सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये बारावीत शिकत असलेल्या व भरतगाव (ता.सातारा) येथील रहिवासी असलेल्या समृद्धी सत्यनारायण शेडगे हिने 11 वा क्रमांक पटकावला आहे. हा बहुमान मिळवणारी ती पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.वडील सत्यनारायण शेडगे हे पत्रकार म्हणून कार्यरत असून आई भरतगाव येथे अंगणवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
’पुढील दोन दशकात अंतराळात कोणती आव्हाने येतील ?’ असा प्रश्न उपस्थित करत इस्त्राsने ही हिंदी भाषेतील निबंध स्पर्धा आयोजित केली होती. याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. इस्त्राsने या स्पर्धेसाठी लाखो विद्यार्थ्यांमधून केवळ 2,298 विद्यार्थ्यांची निवड केली. त्यात महाराष्ट्रातील 156 स्पर्धकांचा समावेश असून निम्म्याहून अधिक मुली आहेत. या मुलींमध्ये समृद्धी शेडगेचा समावेश आहे.विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात या स्पर्ध्येत निवड झालेली समृद्धी शेडगे ही एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे
पूणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा महानगरातील विद्यार्थ्यांना मागे टाकत सातारसारख्या निमशहरी गावात शिकणाया आणि भरतगावसारख्या खेडय़ात राहणाया समृद्धीने हिंदी भाषेत लिहिलेल्या निबंधाची निवड करण्यात आली आहे.तिच्या या सुयशाबद्दल तिचे परिसरातील ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
दरम्यान,समृद्धी शेडगे हिने मिळवलेले यश दैदीप्यमान असून आमच्या महाविद्यालयाच्या या गुणवंत विद्यार्थिनीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. लवकरच तिचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात येणार असल्याचे प्राचार्य बी. टी. जाधव यांनी व्यक्त केला.