सांगलीचीच ‘आधे अधुरे’ द्वितीय तर मुंबईची पैठणी तृतीय
स्वराध्य फाऊंडेशनचे आयोजन
वार्ताहर / मालवण:
स्वराध्या फाऊंडेशन मालवण आयोजित आणि प्राईडलॅण्ड प्रॉपर्टीज एलएलपी प्रायोजित मामा वरेरकर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत राजाराम बापू इन्स्टिस्टय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूरच्या ‘एक्सपायरी डेट’ ने प्रथम क्रमांक प्राप्त केला. लोकरंगभूमी सांगलीच्या ‘आधे अधुरे’ द्वितीय, पाटकर वर्दे महाविद्यालयाची ‘पैठणी’ तृतीय तर अंतरंग थिएटर्स मुंबईच्या ‘खेळा खुळा’ ने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. सर्व विजेत्यांना अभिनेते व परीक्षक संजय मोने, क्षितीज झावरे यांच्या हस्ते रोख रक्कम, चषक, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल दिग्दर्शक – प्रथम – ऋषीकेश जाधव (एक्सपायरी डेट, राजाराम बापू इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर), द्वितीय – धनश्री गाडगीळ (आधे अधुरे, लोकरंगभूमी सांगली), तृतीय – धनंजय पाटील, शेखर रेतकर (खेळ खुळा, अंतरंग थिएटर्स मुंबई), नेपथ्य – प्रथम – आकाश कांबळी (खेळखुळा, अंतरंग थिएटर्स, मुंबई ), द्वितीय – इरफान मुजावर (शेवट तितका गंभीर नाही, समांतर व़िश्रामबाग सांगली), देवेन कोळंबकर (निर्वासित, कलांकुर मालवण), प्रकाश योजना – प्रथम – श्याम चव्हाण (खेळ खुळा, अंतरंग थिएटर्स मुंबई), द्वितीय – प्रथमेश पवार – (पैठणी, पाटकर वर्दे महाविद्यालय), तृतीय – किरण करवडकर (निर्वासित, कलांकुर मालवण), पार्श्वसंगीत – प्रथम – हर्षवर्धन जोशी (दहन आख्यान, बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ), द्वितीय – वैष्णवी शेटय़े (शेवट तितका गंभीर नाही, समांतर विश्रामबाग सांगली), तृतीय – महेंद्र नांदगावकर (वॉर विद इन, थिएटर्स हॉलिक प्रॉडक्शन मुंबई), पुरुष अभिनय – प्रथम – ऋषीकेश जाधव (एक्सपायरी डेट, राजारामबापू इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर), द्वितीय – इरफान मुजावर (आधे अधुरे, लोकरंगभूमी सांगली), धनंजय शरद पाटील (वॉर विदीन, थिएटर्स हॉलिक प्रॉडक्शन), स्त्राr अभिनय – प्रथम – प्रणिता पाटील ( एक्सपायरी डेट, इस्लामपूर), द्वितीय – अक्षता सामंत (अमेय, अंबरनाथ), तृतीय – ज्ञानदा खोत (पैठणी, पाटकर वर्दे) कै. श्रीकांत देसाई सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय पुरस्कार – प्रसाद खानोलकर (भैरवी, नाटय़वेद पिंगुळी), गंगाराम गवाणकर नवीन लेखन पुरस्कार – रोहन पेडणेकर (खेळा खुळा, मुंबई)
स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते संजय मोने, क्षितीज झावरे, स्वराध्या फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पवार, उपाध्यक्ष गौरव ओरसकर, सचिव अभय कदम, मुकेश बावकर, संध्या परुळेकर, गौरीश काजरेकर, शांती पटेल, महेश काळसेकर, दीपक जाधव, सुधीर कुर्ले, रुपेश नेवगी, सचिन टिकम आदी उपस्थित होते.