ग्लोबल प्रॉपर्टी कंसल्टन्सी सॅविल्सची माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस आपला विळखा वाढवत असल्याचे दिसून येत आहे. यातच लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद आहेत. यामुळे याचा परिणाम आगामी आर्थिक घडामोडींवर होणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. परंतु यातही दिलासा देणारी गोष्ट म्हणजे ई कॉमर्स, एफएमसीजी आणि औषध क्षेत्रातील बंदच्या काळातील कामगिरीमुळे आर्थिक क्षेत्राला बळकटी मिळणार आहे.
सध्या बाजारपेठेतून होत असणाऱया मागणीच्या प्रमाणावरुन ई-कॉमर्स, एफएमसीजी आणि औषध कंपन्यांची कामगिरी वेगात राहिल्यास हा फायदा अर्थव्यस्थेला बळकटी मिळणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. दुसऱया बाजूला उत्पादन, वाहन, कापड, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मागणी वाढण्यासाठी अजूनही 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्मयता आहे, अशी माहिती ग्लोबल प्रॉपर्टी कंसल्टन्सी सॅविल्स यांनी दिली आहे. 0 ते सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत सदर क्षेत्रांनी सकारात्मक कामगिरी केल्यास त्याचा लाभ आर्थिक प्रगतीचा वेग वाढण्यात होणार असल्याचे संकेत आहेत.